उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) कुंभमेळ्याची तारीख ठरली आहे. त्याआधीच एका कार्यक्रमादरम्यान मौलवीने कुंभमेळा वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर आयोजित केल्याचा दावा केला आहे. मौलवीच्या या विधानाने नवीन वादाला तोंड फुटले आहे. अखिल भारतीय मुस्लिम जमातीच्या मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेवली यांनी दावा केला की, कुंभमेळा आयोजित करण्यात आलेली जमीन वक्फ बोर्डाची (Waqf Board) आहे.
( हेही वाचा : Fire : पनवेलमधील फार्मा कंपनीत भीषण आग; जीवित हानी नाही)
दरम्यान इस्लामिक धर्मगुरुंनी केलेले दावे फेटाळून लावण्याचे काम हिंदू (Hindu) नेत्यांनी केले आहे. संबंधित कुंभमेळ्याचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले की, धर्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. त्यांच्यावर एफआरआय दाखल नोंदवून त्यांना अटक करण्यात यावे, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. तसेच या मौलवींसारखे लोक निरर्थक वक्तव्य करत राहणार आणि देशात धार्मिक तणाव निर्माण करत वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत, असे चक्रपाणी महाराज म्हणाले आहेत.
मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी (Maulana Shahabuddin Rizvi Barelvi) म्हणाले की, प्रयागराज येथील मुस्लिम समुदायातील लोकांनी वक्फ भूमीवर कुंभ मेळाव्याला परवानगी दिली हे आमचे मोठे मन आहे. त्यामुळे हिंदूंनी या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रवेश देऊन प्रतिसाद दिला पाहिजे, असे म्हणत मौलवीने गरळ ओकली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मौलाना म्हणाले की, आखाडा परिषद, नागा संन्यासी, स्वामी आणि बाबा यांनी कुंभमेळाव्यात मुस्लिमांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली. दुसरीकडे, प्रयोगराजमधील सरताज नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने कुंभमेळ्याची तयारी सुरू असलेल्या ठिकाणची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचे म्हटले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community