श्रीनगर येथील बारामुल्ला (Jammu-Kashmir) जिल्ह्यातील झुला पादचारी पुलाजवळ लष्कर-ए-तोएबाच्या ३ हस्तकांना अटक करून सुरक्षा दलांनी त्यांच्याकडू शस्रसाठा आणि रोख रक्कम जप्त केली आहे. शनिवारी या भागात गस्त सुरू असताना हातात बॅगा घेऊन महामार्गाकडे येणाऱ्या दोन संशयास्पद व्यक्तिंना सुरक्षा दलांनी अडवले होते.
या बॅगांच्या तपासणीत चिनी बनावटीचे हातबॉम्ब आणि अडीच लाख रुपयांची रोकड आढळली होती. घातपात घडवण्यासाठी ही रोकड आणि हातबॉम्ब त्यांना दिल्याची कबुली तिसऱ्या व्यक्तिने दिली आहे. त्यांच्याजवळूनही एक चायनीज हातबॉम्ब आणि २.१७ लाख रोकड जप्त करण्यात आली आहे. शोपिया जिल्ह्यातही दहशतवाद्यांच्या एका हस्तकाला अटक करून सुरक्षा दलांनी शस्त्रास्रे जप्त केली.
(हेही वाचा – China Pneumonia: ‘चिनी न्यूमोनिया’मुळे मोदी सरकारकडून राज्यांना सूचना, जागतिक आरोग्य संघटनेने दिली ‘ही’ माहिती)
Join Our WhatsApp Community