दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. यानंतर विमानाचे श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आले. या विमानात एकूण १७७ प्रवासी होते. (Bomb Threat)
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : ‘बाळा’चे वडील आणि आजोबांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) श्रीनगर विमानतळावर शुक्रवारी (३१ मे) ‘धमकीचा कॉल’ मिळाल्यानंतर सीआयएसएफने तत्काळ कारवाई केली आणि काही काळ विमानतळ बंद केले. यानंतर विस्तारा एअरलाइन्सचे (Vistara Airlines) विमान यूके-६११ सुरक्षितपणे लँड करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग होताच सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. विमानाची तपासणी केली असता त्यात काहीही आढळले नाही. हा धमकीचा बनावट कॉल असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर विमानतळाचे कामकाज सामान्यपणे सुरू झाले. (Bomb Threat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community