जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अनंतनाग येथे जिहादी दहशतवाद्यांनी टेरिटोरिअल आर्मीच्या (प्रादेशीक सेना) २ जवानांचे ८ ऑक्टोबर रोजी अपहरण केले होते. त्यापैकी एका जवानाचा मृतदेह बुधवारी (०९ ऑक्टोबर) जंगलात आढळून आलाय. हिलाल भट (रा. मुकधमपोरा नौगाम) असे या जवानाचे नाव आहे.
(हेही वाचा – Gram Sabha न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची हकालपट्टी)
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार जंगलात दहशतवाद्यांच्या हालचाली असल्याचा सुगावा सुरक्षा दलांना लागला होता. त्यानंतर टेरिटोरिअल आर्मीच्या २ जवानांना अधिक माहिती मिळवण्यासाठी जंगलात पाठवण्यात आले होते. याठिकाणी जिहादी दहशतवाद्यांनी या दोन्ही जवानांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एक जवान तेथून निसटण्यात यशस्वी झाला. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा – India–Pakistan border : सीमेलगतच्या रस्त्यांचा विकास होणार, २,२८० किमी लांबी, ४, ४०० कोटींचा निधी; मोदी सरकारचा मोठा निर्णय)
यादरम्यान तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरा जवान हिलाल भट बेपत्ता होता. त्याच्या अपहरणाची माहिती मिळताच सुरक्षादलांनी जंगलात शोध मोहिम हाती घेतली. दरम्यान बुधवारी हिलाल भटचा मृतदेह हाती लागला. दहशतवाद्यांनी त्याला ठार केले. भट यांच्या शरीरावर गोळीबाराच्या खुणा आढळून आल्या आहेत. (Jammu and Kashmir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community