Jammu And Kashmir Election Results 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ; जाणून घ्या 

172
Jammu And Kashmir Election Results 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ; जाणून घ्या 
Jammu And Kashmir Election Results 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर ; जाणून घ्या 

जम्मू-काश्मीरमध्ये आर्टिकल 370 (Artical 370) हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या राज्यात एकूण 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. दरम्यान, मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.   (Jammu And Kashmir Election Results 2024)

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या (Jammu and Kashmir election) एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजपा स्वबळावर रिंगणात उतरले होते. त्याचे निकाल आता समोर येत आहे. 

(हेही वाचा – BMC : गळती दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांचे संगनमत; माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केली चौकशीची मागणी)

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. त्यानंतर आता थेट 2024 मध्ये निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने लढत आहेत. तर भाजपा एकटा निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, काश्मीरमधून मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस तब्बल 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 25 आणि इतर 15 जागांवर आघाडीवर आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.