Jammu and Kashmir : पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला

जम्मू-काश्मीरचा पीर पंजाल रेंज अंतर्गत राजौरी आणि पुंछ सेक्टर २००३ पासून दहशतवादापासून मुक्त होता. परंतु ऑक्टोबर २०२१ पासून येथे पुन्हा मोठे हल्ले सुरू झाले आहेत. गेल्या ७ महिन्यांत येथे २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर मागील २ वर्षांत ३५ हून अधिक जवान शहीद झाले आहेत.

186
Jammu and Kashmir : पुंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये शुक्रवार १२ जानेवारी रोजी जिहादी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. पुंछ जिल्ह्यातील खनेतर भागात संध्याकाळी झालेल्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. सध्या या भागात गोळीबार सुरू आहे. हा परिसर रिकामा करून लष्कराने शोधमोहीम राबवली आहे.

(हेही वाचा – Crime News : मिठी नदीत सापडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, अनैतिक संबंधातून केली होती हत्या)

यासंदर्भातील माहितीनुसार पुंछमधील (Jammu and Kashmir) रस्त्यालगत असलेल्या टेकडीवरून लष्कराच्या वाहनावर २ राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेत सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाहनाचे नुकसान झाले. गोळीबारानेतर दहशतवाद्यांनी पळ काढला असून त्यांचा शोध सुरु आहे.

(हेही वाचा – Local services : ‘पुणे ते लोणावळा’दरम्यान बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या वेळ)

भारतीय लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला –

गेल्या तीन आठवड्यांत या भागात (Jammu and Kashmir) लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी राजौरीतील डेरा गल्लीत २ लष्करी वाहनांवर झालेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले होते, तर ५ जण जखमी झाले होते. दरम्यान शुक्रवार संध्याकाळी झालेला हल्ला हा पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर झाला आहे.

मागील २ वर्षांत ३५ हून अधिक जवान शहीद – 

जम्मू-काश्मीरचा पीर पंजाल रेंज अंतर्गत राजौरी आणि पुंछ सेक्टर २००३ पासून दहशतवादापासून मुक्त होता. परंतु ऑक्टोबर २०२१ पासून येथे पुन्हा मोठे हल्ले सुरू (Jammu and Kashmir) झाले आहेत. गेल्या ७ महिन्यांत येथे २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर मागील २ वर्षांत ३५ हून अधिक जवान शहीद झाले आहेत. (Jammu and Kashmir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.