जम्मू आणि काश्मीरचे मूळ रहिवासी असलेल्या, मात्र आश्रय घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेलेल्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजौरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पोलिसांकडे जम्मू काश्मीरच्या विविध भागांत सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांची यादी असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे तसेच ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.त्या दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही.त्यांनी परत येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मारले जाईल, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – Jalna Maratha Resrvation : सरकारकडून निरोप न आल्यास सलाईन काढणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा)
घुसखोरीचे सर्व मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असल्याचे सिंग यांनी सांगितले तसेच सीमा ग्रिड आणखी मजबूत करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी लष्करासह पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा दहशतवादी संघटनांचा निधी रोखण्यासाठी त्यांच्या छुप्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. पीओकेमध्ये दहशतवादी बनण्यासाठी आलेल्या जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांची मालमत्ता जप्त करणे हा नव्या हालचालीचा भाग आहे,म्हणून पाहिले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community