जम्मू-काश्मीरच्या गांदरबल येथे रविवारी (20 ऑक्टोबर) जिहादी दहशतवाद्यांनी जैदमोध बोगदा प्रकल्पात कार्यरत असलेल्या कामगारांच्या कॅम्पवर हल्ला केला. यात 7 कामगार ठार झाले असून 5 जण जखमी आहेत. या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी कामगारांच्या दिनचर्येची संपूर्ण रेकी केल्याची माहिती पुढे आली आहे. (Jammu and Kashmir)
श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील झोजिलाच्या पायथ्याशी असलेल्या गगनगीर सोनमर्ग येथील जैदमोध बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांच्या कॅम्पवर रविवारी जिहादी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा- Bomb Threats in Flights : भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी)
सर्व जखमींना उपचारासाठी सौरा येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात अनिल शुक्ला (अभियंता), मोहम्मद हनीफ, कलीम, शशी अब्रोल, फहीम नसीर, गुरमीत सिंग आणि डॉ. शहनवाज या 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक डॉक्टर आणि 6 कामगारांचा समावेश असून यापैकी 5 जण परप्रांतीय होते. लश्कर-ए-तय्यबाशी संबंधीत ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. राज्यात 2024 मध्ये आतापर्यंत परप्रांतीय कामगारांवर 5 वेळा हल्ले झाले आहेत. यातील पहिला हल्ला 7 फेब्रुवारी रोजी श्रीनगरमध्ये झाला होता. त्यात अमृतपाल आणि रोहित मसिह या दोघांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 8 एप्रिल रोजी शोपियानच्या पदपवन येथे परमजित सिंग नामक वाहनचालकाचा खून करण्यात आला. तर 17 एप्रिल रोजी शोपियानमध्येच शंकर शाह याला गोळ्या घालण्यात आल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता ऑक्टोबरमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टार्गेट किलींग सुरू झाले असून 18 ऑक्टोबरला अशोक चौहान नामक कामगाराची आणि रविवारी 7 जणांची हत्या केली. दरम्यान रविवारच्या हत्याकांडानंतर सुरक्षादलांनी गांदरबलची चोहीबाजूंनी नाकाबंदी करून शोधमोहिम हाती घेतली आहे. (Jammu and Kashmir)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community