Jammu and Kashmir : घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक; ‘एलओसी’वर शस्त्रास्त्रांसह अंमली पदार्थ केले जप्त

हे तिघे 30 मे रोजी रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

148
Jammu and Kashmir : घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक; 'एलओसी'वर शस्त्रास्त्रांसह अंमली पदार्थ केले जप्त

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) मरमारहा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय सैन्याने मंगळवारी (३० मे) रात्री 3 जिहादी घुसखोरांना अटक केली आहे. मोहम्मद फारुख (26), मोहम्मद रियाझ (23) आणि मोहम्मद जुबेर (22) अशी घुसखोरांची नावे आहेत. सर्व करमारहा येथील रहिवासी आहेत.

(हेही वाचा – शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांना ‘त्या’ प्रकरणातून मिळाली क्लिन चीट)

सैन्यातील (Jammu and Kashmir) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तीन घुसखोरांना सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि ड्रग्सची खेप मिळाली होती. हे तिघे 30 मे रोजी रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

यावेळी कुंपण ओलांडून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांवर (Jammu and Kashmir) सैन्याने गोळीबार केला. यामध्ये एका दहशतवाद्याच्या पायाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 10 किलो आयईडी, एके-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ड्रग्स जप्त केले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या एका दहशतवाद्यावर पुंछ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैन्याकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.