Jammu-Kashmir Accident : जम्मू-काश्मीर अपघातातील मृतांना मदत जाहीर, पंतप्रधानांनी ‘X’ द्वारे व्यक्त केल्या भावना

या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून नुकसान भरपाई दिली जाईल.

67
Jammu-Kashmir Accident : जम्मू-काश्मीर अपघातातील मृतांना मदत जाहीर, पंतप्रधानांनी 'X' द्वारे व्यक्त केल्या भावना
Jammu-Kashmir Accident : जम्मू-काश्मीर अपघातातील मृतांना मदत जाहीर, पंतप्रधानांनी 'X' द्वारे व्यक्त केल्या भावना

जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir Accident) दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई तसेच जखमी प्रवाशांना उपचारांसाठी मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीरच्या दोडा इथं झालेला बस अपघात खूपच दुःखदायक आहे. या अपघातात ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना आणि प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. तसेच जे जखमी झाले आहेत, ते लवकरात बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.

या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल तसेच जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.