Jammu Kashmir : काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये; चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन

161
Jammu Kashmir : काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये; चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन
Jammu Kashmir : काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये; चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन

काश्मीरमधील (Jammu Kashmir) सर्व प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी कोणत्याही एकतर्फी कारवाईला आमचा विरोध आहे, असे निवेदन चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) यांनी संयुक्तरित्या दिले आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीनच्या ५ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे निवेदन देण्यात आले. (Jammu Kashmir)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Pak : बुमराची जादूई ४ षटकं, भारताची पाकिस्तानवर पुन्हा मात )

चीनच्या (China) बाजूने ‘जम्मू-काश्मीरचा वाद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव आणि द्विपक्षीय करार यांनुसार न्याय्य अन् शांततापूर्ण मार्गाने सोडवला जावा’, असा पुनरुच्चार करण्यात आला. निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या प्रमुखांनी चीन-पाकिस्तान (China-Pakistan) आर्थिक महामार्गाचे त्याच्या विरोधकांपासून संरक्षण करण्यास सहमती दर्शवली. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराला चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडतो. हा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून बांधला जात असल्याने भारताचा या महामार्गाला विरोध आहे. (Jammu Kashmir)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.