सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी, २२ जानेवारीला हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृ शक्ती संस्थेच्या नलिनी वायाळ, विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
रविवारी सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरुवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत, त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भिसे यांनी दिली.
(हेही वाचा – एसटीतून प्रवास करणा-या महिलांसाठी महत्त्वाची बातमी; महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय)