मुंबई-गोवा महामार्गावरून एक लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होत असून, गणेशोत्सव कालावधीसाठी महामार्गावर जनसुविधा केंद्र सुरू केली जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना मदत मिळेल व प्रवास चांगला होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. यावेळी ओव्हर टेक टाळून प्रवासात कोंडी न होण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मुंबई ते गोवा या महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या भागातील कामाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते कशेडी टनेलचे लोकार्पण करण्यात आले. पनवेल कासू या पहिल्या ४२ किलोमीटर एक लेन पूर्ण झाली असून पैकीकाही किरकोळ स्पॉट वगळता इतर वाहतुकीसाठी योग्य आहे. दूसरा टप्प्याातील कासू ते इंदापूर मधील कामे वेगाने केली जात आहेत. यामध्ये सीबीटी तंत्राचा वापर करून कामे केली जात आहेत. अवजड वाहनांना वाहतूक बंदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग वरील कासू पासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आदेश दिले असून तीन ते चार दिवसात राहिलेली कामे पूर्ण केली जातील, असे चव्हाण यांनी सांगितले.
गणेश भक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी महामार्गावर गणेशोत्सव कालावधीसाठी सुविधा केंद्र सुरू केली जात आहेत. खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी., पोलादपूर या ठिकाणी जनसुविधा केंद्रावर पोलीस मदत केंद्र, वैदयकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – BMC : उद्यान, खेळाच्या मैदानांच्या नव्या धोरणाला काँग्रेसने दर्शवला विरोध, माजी विरोधी पक्षनेत्यांनी ‘ही’ मांडली बाजू)
कशेडी बोगद्याचे लोकार्पण
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर ते खेड दरम्यान कशेडी घाटातील दोन किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे प्रवासातील इंधन व वेळेत होणार बचत होणार असल्याने याचा फायदा वाहनधारकांना होईल. एकूण १७ किलोमीटर अवघड अंतर या दोन किलोमीटर टनेल मुळे सोपे व कमी झाले आहे. तसेच घाटातील प्रवासाची ४५ मिनिटे वाचेल. यावेळी बोगद्याच्या प्रवेश मार्गाच्या बाजूला मंत्री चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community