तिसऱ्या लाटेतील रुग्ण वाढीचा उच्चांक कधी? काय म्हणाले राजेश टोपे?

93

राज्यात सध्या कोरोना संक्रमित रुग्ण संख्या वाढत असली तरी अजून तिसऱ्या लाटेचा राज्यात पीक आलेला नाही, जानेवारीच्या अखेरीस रुग्ण वाढीचा उच्चांक गाठला जाईल, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

राज्यातील १,७१० एवढे आयसीयू बेड भरले

सध्या रुग्ण संख्या जर वाढत असली तरी खूप मोठ्या संख्येने मृत्यू होतात, ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे, अशी परिस्थिती नाही, सध्या राज्यात ३८ हजार ८५० आयसीयू बेड्स आहेत. यातील १,७१० एवढेच भरलेले आहेत. आयसीयू बेड्सच्या उपलब्धतेच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी आहे.व्हेंटिलेटर बेड्स 16 हजार आहेत, त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या ७०० आहे. १ लाख ३४ हजार ऑक्सिजन बेड्स आहेत. यातून एक गोष्ट दिसते की, पायाभूत सुविधांवर ताण येईल असे चित्र नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या बैठकीत आम्ही हेच सांगितले. आजच्या बैठकीत टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यावरच भर देण्याबद्दल चर्चा झाली. लसीकरणावरही आपल्याला भर द्यायचा आहे, असेही टोपे म्हणाले.

(हेही वाचा वीर सावरकर यांचे विचार चिरंतन, कालातीत! प्रवीण दीक्षितांनी सावरकर युगाचा घेतला मागोवा)

सौम्य लक्षणे असलेले 13 टक्के रुग्ण 

लक्षणे नसलेले राज्यात जवळपास 85 टक्के रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असलेले 13 टक्के आहेत. एक टक्के आयसीयूत भरती आहेत आणि दोन टक्के ऑक्सिजन बेडवर आहेत. या परिस्थितीत लक्षणे नसलेले जे लोक आहेत, त्यांना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करायला हवे. दरम्यान, राज्यातील कोरोना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने नवीन निर्बंध जारी केले आहेत. ते कायम राहतील, असेही टोपे यांनी म्हटले आहे. 9 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपासून हे निर्बंध लागू झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.