Claim Review : समाजमाध्यमांतील पोस्टवर एका पुलाचा फोटो शेअर करत दावा करण्यात आला होता की, तो फोटो उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधील कंबोह पुलाचा आहे.
Claimed By : सोशल मीडिया युजर्स
Fact Check : दिशाभूल
Created By : विश्वास न्यूज
Translate By : हिंदुस्थान पोस्ट मराठी
सोशल मीडियावर एका पुलाचा फोटो शेअर करत दावा केला जात आहे की, तो फोटो सहारनपुरमधील (Saharanpur) कंबोह पुलाचा (Kamboh Bridge) आहे. विश्वास न्यूजने आपल्या तपासणीत हा दावा असत्य असल्याचे सांगितले. मुळात व्हायरल फोटो भारतातील नसून जपानमधील एशिमा ओहाशी ब्रिजचा (Eshima Ohashi Bridge) आहे. एशिमा ओहाशी ब्रिज नाकाउमी तलावावर आहे. हा ब्रिज शिमाने प्रांतातील मात्सु आणि टोटोरी प्रांतातील सकामिनातोला जोडतो. (Fact Check)
का व्हायरल होतोय फोटो?
फेसबुक युजर्स राज एस याने दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी व्हायरल पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले होते की, उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमधील कंबोह पुलाची अप्रतिम छायाचित्र. (Fact Check)
सत्यता पडताळणी
व्हायरल फोटोची सत्यता पडताळणी करण्यासाठी विश्वास न्यूजने गुगल रिवर्स इमेजद्वारे सर्च केले. हे छायाचित्र ‘पिनटेरेस्ट’च्या वेबसाईटवर मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल छायाचित्र जपानमधील एशिमा ओहाशी ब्रिजचे आहे. दरम्यान गुगर संबंधित कीवर्डद्वारे सर्च केल्यावर या दाव्यासंदर्भातील एक रिपोर्ट जपानमधील वेबसाईट अंकोयू- शिमानेवर मिळाला. रिपोर्टनुसार, हा ब्रिज म्हणजे एक उभा उतार असल्याचे दिसले. एशिमा ओहाशी ब्रिजच नाकाउमी तलावावर बनलेले आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी दैनिक जागरणने सहारनपुर जिल्ह्याचे प्रभारी कपिल कुमार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी व्हायरस दाव्याला चुकीचे असल्याचे सांगितले. (Fact Check)
(सदर फॅक्ट चेक विश्वास न्यूज https://www.vishvasnews.com/world/fact-check-viral-image-of-japan-bridge-mistaken-as-saharanpur-uttar-pradesh/ या वेबसाईटने प्रसिद्ध केलं आहे. ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा भाग म्हणून ‘हिंदुस्थान पोस्ट’ने त्याचा अनुवाद केला आहे)
Join Our WhatsApp Community