Japan Defence Budget : जपानच्या संरक्षण धोरणात मोठे बदल; शस्त्रास्त्रे निर्यातीला दिली मंजुरी

Japan Defence Budget : जपानच्या संरक्षण धोरणात मोठे बदल; शस्त्रास्त्रे निर्यातीला दिली मंजुरी

146
Japan Defence Budget : जपानच्या संरक्षण धोरणात मोठे बदल; शस्त्रास्त्रे निर्यातीला दिली मंजुरी
Japan Defence Budget : जपानच्या संरक्षण धोरणात मोठे बदल; शस्त्रास्त्रे निर्यातीला दिली मंजुरी

जपान सरकारने संरक्षण क्षेत्राशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. (Japan Defence Budget) फुमियो किशिदा (Fumio Kishida) सरकारने संरक्षण बजेटमध्ये एकाच वेळी 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जपानने शस्त्रास्त्रे (Weapons) आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यातीवरील (Defense Technology Exports) बंदी उठवली आहे. वास्तविक हे दोन्ही निर्णय संरक्षण परिषदेच्या रोडमॅपची अंमलबजावणी करण्यासाठी घेण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Indian Army: भारतीय लष्करप्रमुख राजौरी सेक्टरला भेट देऊन दहशतवादविरोधी मोहिमांचा आढावा घेणार)

जपानने 3 वर्षांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Security Council (NSC)) स्थापन केली आहे. चीनकडून सुरक्षेचा वाढता धोका लक्षात घेऊन वेगाने तयारी करणे, हा त्याचा उद्देश होता. अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे (Weapons) आणि लढाऊ विमानांसोबतच (fighter jets) जपान अमेरिकेकडून क्षेपणास्त्रेही खरेदी करत आहे.

जपानचे सैन्य शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ठेवणे गरजेचे – फुमियो किशिदा

जपानचे पंतप्रधान (Prime Minister of Japan) किशिदा यांनी या दोन्ही निर्णयांविषयी जनतेला संबोधित केले आहे. ते म्हणाले की, ”हिंद आणि प्रशांत महासागरात शांतता नांदावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी जपानचे सैन्य अद्ययावत संरक्षण तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. कमकुवत राहून स्वतःचे संरक्षण करणे शक्य नाही.”

(हेही वाचा – Kalyan Banerjee : कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; दिले ‘हे’ कारण)

अमेरिकेला पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान हस्तांतरित करणार

मंत्रीमंडळाच्या या निर्णयानंतर जपान सरकारने केलेला पहिला करारही समोर आला. जपान लवकरच अमेरिकेला पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे (Patriot Missiles) नवीन तंत्रज्ञान हस्तांतरित करणार आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतच (America) तयार केले जाणार आहे. अमेरिकेकडे पॅट्रियट क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा परवाना आहे, पण ते जपानमध्ये तयार केले जात आहेत. आता हे दोन्ही देशांमध्ये बनवले जाणार असून तंत्रज्ञानाची देखरेख जपानकडून केली जाणार आहे. (Japan Defence Budget)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.