Japan Earthquake: जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, ओकिनावामधील मुख्य विमानतळावरून उड्डाणे स्थगित

179
Japan Earthquake: जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, ओकिनावामधील मुख्य विमानतळावरून उड्डाणे स्थगित

जपानमधील (Japan Earthquake) होन्शूच्या पूर्व किनारपट्टीवर गुरुवारी, (४ एप्रिल) ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने भूकंपाची तीव्रता ३२ किमी असल्याची माहिती दिली आहे तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता ५५ किमी होती, असे असल्याचे सांगण्यात आले आहे.

तैवानमध्ये बुधवारी, (३ एप्रिल) ७.२ तीव्रतेच्या भूकंपानंतर जपानच्या ओकिनावाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्यानंतर जपानच्या ओकिनावामधील मुख्य विमानतळावरून आपली उड्डाणे स्थगित केली. तैवानची राजधानी तैपेईमध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. रॉयटर्सच्या एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा धक्का शांघायपर्यंत जाणवला. चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, चीनच्या फुजियान प्रांतातील फुझोऊ, झियामेन, क्वानझोऊ आणि निंगडे येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

(हेही वाचा – IPL 2024, Siddhartha Dismisses Kohli : कोहलीला बाद करशील का? या प्रश्नावर तो ‘हो’ म्हणाला आणि… )

तत्पूर्वी, २ एप्रिल रोजी जपानच्या इवाते प्रांताच्या उत्तर किनाऱ्यावर सोमवारी-मंगळवारी मध्यरात्री ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, असे जपानच्या हवामानशास्त्र केंद्राने सांगितले. भूकंपाचे धक्के सकाळी 00:59 वाजता जाणवले. (IST). भूकंपाचा केंद्रबिंदू इवाटे प्रांताचा उत्तर किनारपट्टीचा भाग होता, एजन्सीने सांगितले की त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.