संभल, अजमेरनंतर आता Atala Masjid वर होणार सुनावणी ; देवीचे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा

40
संभल, अजमेरनंतर आता Atala Masjid वर होणार सुनावणी ; देवीचे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा
संभल, अजमेरनंतर आता Atala Masjid वर होणार सुनावणी ; देवीचे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा

उत्तर प्रदेशातील संभल, अजमेरनंतर आता जौनपूर मशिदीवर (Atala Masjid) सुनावणी होणार आहेत. याठिकाणी कन्नौजचा राजा विजयंचद्र याने अटला देवीचे मंदिर बांधले होते, असे हिंदू (Hindu) पक्षकारांचे म्हणणे आहे. १४ व्या शतकात फारोह शाह तुघलकाने मंदिर पाडून तिथे मशिद (Atala Masjid)बांधली आणि तिथे हिंदूंना पूजाअर्चा करण्यास विरोध केला. यासंदर्भात स्वराज वाहिनी संघटनेने जौनपूरच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. (Jaunpur mosque survey)

( हेही वाचा : Leader Of Opposition पदावरून कॉंग्रेस-शिवसेना उबाठामध्ये जुंपली!

दिवाणी न्यायालयात संतोष मिश्रा यांनी मशिद ही देवीचे मंदिर असल्याचा दावा केला. घटनास्थळी असलेले मशीद हे मंदिर असल्याने या धर्मस्थळावर केवळ हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात येत आहे. १३ व्या शतकात हिंदूंनी फिरोज तुघलकाने भारतावर आक्रमण केल्यानंतर हे मंदिर अर्धवट पाडण्यात आल्याचा आरोप हिंदूंनी (Hindu) केला. त्याच मंदिराच्या अर्धवट बांधकामावर मशीद बांधण्यात आली होती, असे सांगण्यात आले. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, संबंधित धर्मस्थळात हे हिंदूंचे मंदिर (Hindu temple) असल्याचा दावा करण्यात आला.

त्यानंतर दि. २ जुलै २०२४ रोजी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. तसेच पाहणी पथक ३० जुलै रोजी दाखल झाले असून आता याला प्रचंड विरोध करण्यात आला आहे. यावेळी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीचे सर्व दरवाजे बंद होते, यावेळी सर्वेक्षण करण्यासाठी काही लोक पुन्हा परतले होते. त्यावेळी ३१ जुलै रोजी सर्वेक्षण पथकाने आपला अहवाल न्यायालयाकडे दाखल केला असून ते सर्वेक्षण करण्यासाठी गेले असता, संबंधित ठिकाणी वर्दळ असल्याने सर्वेक्षण होऊ शकले नसल्याची विनंती त्यांनी केली असून सर्वेक्षणाचे स्वरूप १६ डिसेंबर रोजी ठरवायचे असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. (Atala Masjid)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.