संगीतकार जावेद अख्तर यांच्यातील धर्मांधपणा अनेकदा त्यांच्या या ना त्या वक्तव्यावरून उघड होत असतो. असाच धर्मांधपणा पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामधून उघड झाला आहे. सध्या देशभरात हिंदूंना दिलेली सापत्न वागणूक दूर करण्यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. मात्र यामुळे मुसलमानांना देण्यात येणाऱ्या विशेष सवलती आणि अधिकारांवर गदा येणार म्हणून मुसलमान कायम आरडाओरडा करत असतात, असाच प्रकार जावेद अख्तर यांनी एक वृत्त वाहिनीवर मुलाखत देताना केला आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?
जावेद अख्तर यांनी सामान नागरी कायद्याविषयी चुकीचे मत प्रदर्शन करण्याचा हेतुतः प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, ‘मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. जेव्हा मला माझ्या संपत्तीचे वाटे करायचे असतील तेव्हा मी त्याचे दोन समान वाटे करणार’. समान नागरी कायद्याचा अर्थ केवळ सर्व समाजासाठी एक कायदा असणे असा नाही होत, तर महिला आणि पुरुषांसाठी देखील एक समान कायदा हवा. जर पुरुषांना एकाहून अधिक पत्नी ठेवण्याचा अधिकार दिला गेला आहे तर महिलांना देखील एकहून अधिक पती ठेवण्याचा अधिकार द्यायला हवा. जर असे केले नाही तर मग महिलांना-पुरुषांना आपण समान हक्क दिले आहेत असे कसे आपण म्हणू शकतो. जावेद अख्तर यांच्या विधानानंतर काही लोकांनी अख्तर यांच्या विरोधात सोशल मीडियात जोरदार टीका करणे सुरु केले आहे.
Join Our WhatsApp Community