पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू (Former Pakistan cricketer) जावेद मियांदाद आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी त्याच्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन आणि अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम. मियांदाद (Javed Miandad) आणि त्याच्या कुटुंबाला पाकिस्तानी लष्कराने नजरकैदेत ठेवले आहे.
(हेही वाचा – Donald Trump : जर मी दुसऱ्यांदा राष्ट्रपती झालो, तर…; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा जिहाद्यांना इशारा)
दाऊद इब्राहिमच्या मुलीशी मियांदादच्या मुलाचा निकाह
दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) मोठी मुलगी महरुख हिचा निकाह पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याचा मुलगा जुनैद याच्याशी 2006 साली झाला होता. त्यामुळे दोघांचे नातेसंबंध आहेत.
पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद
भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब या सोशल मीडिया वेबसाइट्स लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Terrorist killed: लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार)
भारतियांनी व्यक्त केला आनंद
56 वर्षीय दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह विविध गुन्हेगारी कारवायांशी संबंधित आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा तो सूत्रधार आहे. त्या स्फोटांमध्ये 250 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आणि हजारो लोक जखमी झाले.
ट्विटरवर (एक्स) दाऊद इब्राहिमच्या विषप्रयोगाच्या बातम्या टॉप ट्रेंडमध्ये आहेत. बहुतेक भारतीय वापरकर्ते आनंद व्यक्त करत आहे. ही माहिती खरी आहे का, असे विचारत आहेत. शेकडो वापरकर्त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांचा फोटो शेअर करून त्यांचे कौतुक केले आहे.
ट्विटर वापरकर्त्यांच्या टिप्पण्यांमध्ये अजित डोवाल (NSA Ajit Doval) यांना याचे श्रेय दिले जात आहे. मात्र, भारत सरकार किंवा स्वतः डोवाल यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही.
(हेही वाचा – PSU Banks Merger : ‘त्या’ सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार नसल्याचं अर्थमंत्रालयाने केलं स्पष्ट)
जावेद मियादादची क्रिकेट कारकीर्द
जावेद मियांदाद (Javed Miandad) हा माजी पाकिस्तानी क्रिकेटर आहे. मियांदादने 121 कसोटी सामन्यांमध्ये 189 डावांत 23 शतके आणि 43 अर्धशतकांसह 8832 धावा केल्या आहेत. 223 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 218 डावांत 8 शतके आणि 50 अर्धशतकांसह 7381 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 17 आणि एकदिवसीय सामन्यात 7 बळी घेतले आहेत.
हेही पहा –