भारतीय रेल्वे बोर्डाला प्रथमच एक महिला अध्यक्ष मिळाल्या आहेत. (Railway First Woman Chairman) केंद्र सरकारने गुरुवारी भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा सदस्य जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. अशा प्रकारे रेल्वेची कमान पहिल्यांदाच एका महिलेकडे सोपवण्याचे ऐतिहासिक पाऊल सरकारने उचलले आहे. जया वर्मा सिन्हा या 1986 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. सध्या त्या भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या अधिकारी आहेत आणि त्या रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन आणि व्यवसाय विभागाच्या सदस्य आहेत. १ सप्टेंबरपासून त्या पदभार स्वीकारणार आहेत.
(हेही पहा – Special Session Of Parliament : केंद्र सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन)
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जया वर्मा यांना यासंबंधीचे नियुक्ती पत्र जारी केले आहे. रेल्वेने यासाठी ४ जणांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने जया वर्मा सिन्हा यांना अध्यक्ष बनवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर जया वर्मा सिन्हा बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष आणि सीईओ ए.के. लाहोटी यांच्या कडून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल. ओडिशामधील बालासोरमधील कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताच्या वेळी जया वर्मा सिन्हा यांनी जबाबदारीने काम पाहिले. त्या संपूर्ण घटनेवर बारीक लक्ष ठेवून होत्या. त्यांनी पंतप्रधान कार्यालयात या घटनेविषयी पॉवर प्रेझेंटेशनही दिले होते. या काळात त्यांच्या कार्यशैलीचे खूप कौतुक झाले. आता सरकारने जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. (Railway First Woman Chairman)
जया वर्मा सिन्हा या अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी आहेत. त्या 1988 मध्ये भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत रुजू झाल्या. त्यांनी उत्तर रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे आणि पूर्व रेल्वेमध्येही काम केले आहे. सिन्हा यांनी ४ वर्षे बांगलादेशातील ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. बांगलादेशात त्यांच्या कार्यकाळातच कोलकाता ते ढाका धावणाऱ्या मैत्री एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. (Railway First Woman Chairman)
हेही पहा –