जयश्री पाटलांनी मारली थोबडीत! व्हिडीओ व्हायरल

95

संपकरी एसटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे सध्या अडचणीत आहेत. संपकरी कामगारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून सध्या त्या फरार आहेत. मात्र आता पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात त्यांनी एका महिलेच्या कानशिलात लागवल्याचे दिसत आहे. या व्हिडिओबाबत मात्र सविस्तर माहिती मिळाली नाही, परंतु हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ सदावर्ते राहत असलेल्या परेल येथील क्रिस्टल टॉवर  येथील आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला जयश्री पाटील यांनी तू मला मारलेस असे म्हणत आहे. त्यानंतर पाटील त्या महिलेच्या अंगावर धावून जात आहेत. त्यावेळी आरडाओरडाही झालेला दिसत आहे. त्यात एका लहान मुलाच्या रडण्याचाही आवाज येत आहे. दरम्यान हा प्रकार नक्की काय आहे, हे कळले नाही.

(हेही वाचा बोलका हा दुरावा… शिवसेनेला वाटतेय हिंदुत्वाचा मुद्दा गमावण्याची भीती!

या आधी झेनचा व्हिडीओ व्हायरल! 

याआधी गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन ही दादर-ठाणे मार्गावर चारचाकी वाहन चालवताना दिसत आहे. त्यावेळी झेनही १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी असताना ती वाहन चालवत आहे, हे दिसत आहे, तसे स्वतः गुणरत्न सदावर्ते सांगत आहेत, असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामुळे गुणरत्न सदावर्ते अडचणीत आले आहेत. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सदावर्तेंच्या घरात गाढव 

सोशल मीडियात आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सदावर्ते यांच्या घरात एक गाढव पाळला आहे. त्याला जयश्री पाटील आणि त्यांची मुलगी झेन चारा भरवत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबतही काही सुस्पष्टता नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.