Jaydeep Apte: राजकोट येथील पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक, मालवण येथे नेऊन करणार चौकशी

147
Jaydeep Apte: राजकोट येथील पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक, मालवण येथे नेऊन करणार चौकशी
Jaydeep Apte: राजकोट येथील पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अटक, मालवण येथे नेऊन करणार चौकशी

सिंधुदुर्ग येथील राजकोट (Sindhudurg Rajkot Fort) येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) यांना बुधवारी सायंकाळी कल्याण येथून अटक करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतप्त लाट उसळली. या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. घटना घडल्याच्या दिवसापासून शिल्पकार जयदीप आपटे हे पसार झाले होते. (Jaydeep Apte)

(हेही वाचा – Shiv Sena UBT ने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या १५०० रुपयांची तुलना केली ‘दारूच्या पेग’शी)

आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटेंच्या कल्याण मधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते. त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असे लिहून त्यांचा फोटो चिटकवण्यात आला होता. त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली असता जयदीप आपटे यांच्या विषयी माहिती घेतली होती. (Jaydeep Apte)

(हेही वाचा – IPL Valuation : आयपीएलचं मूल्यांकन १० टक्क्यांनी घटलं)

बाजारपेठ पोलिसांना गुरुवारी अशी माहिती मिळाली की, आपटे हे त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याच्या कल्याण मधील बाजारपेठे येथील घरी येणार आहे. पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली असून, तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले. पोलिसांकडून त्यांची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी (५ सप्टेंबर) सकाळी जयदीप आपटे (Jaydeep Apte) याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.