रविवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजता जेईई अॅडव्हान्स २०२३ (JEE Advanced 2023) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
आयआयटी गुवाहाटीने जेईई ॲडवान्स २०२३ (JEE Advanced 2023) चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत हैदराबाद झोनचा वाविला चिदविलास रेड्डी ३६० पैकी ३४१ गुणांसह अव्वल ठरला आहे. तर यावर्षी एकूण १ लाख ८३ हजार ७२ विद्यार्थ्यांपैकी ४३ हजार ७७३ जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३६,२०४ मुले आणि ७,५०९ मुलींचा समावेश आहे.
(हेही वाचा – सेनेच्या वर्धापन दिनापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार)
यावर्षी जेईई अॅडव्हान्स २०२३ (JEE Advanced 2023) ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होती. तर दुसरी शिफ्ट दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे.
‘असा’ पहा निकाल
- JEE Advanced परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या
- यानंतर मुख्यपृष्ठावरील निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- तेथे तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर सबमिट करा.
- आता तुम्हाला निकाल दिसेल.
- त्यानंतर निकाल डाउनलोड करा.
- तुम्ही निकालाची प्रिंट आउटदेखील घेऊ शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community