JEE Mains 2023 या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. कारण, या मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
National Testing Agency च्या वतीने हा निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन तिथे Login करत परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहेत. यासाठी त्यांना लाॅग ईन करताना Application Number आणि जन्मतारखेची पूर्तता करणे अपेक्षित असेल.
निकालासोबतच NTA कडून B.E आणि B.Tech च्या प्रश्नपत्रिकांची अंतिम उत्तरेही देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे निकाल पाहण्यासोबतच अधिकृत संकेतस्थळावर Answer Key सुद्धा पाहू शकतात.
( हेही वाचा: IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना )
उत्तरपत्रिका पाहताना लक्षात ठेवा
- सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
- आता जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल पाहण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करा
- आता PDF फाईल डाऊनलोड करा आणि अंतिम उत्तर पत्रिका पाहा.
- 2023 च्या परीक्षांसाठी जवळपास 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रासाठी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 8.6 लाख विद्यार्थ्यांनी पेपर 1बीई/बी.टेक आणि 46 हजार विद्यार्थ्यांनी पेपर (बी.आर्क/बी.प्लॅनिंग) अर्ज केले होते.