सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात हलाल पद्धतीचे मांस विक्री होत आहे. त्यामध्ये भेसळयुक्त मटणाची विक्री केली जाते. त्यामुळे खाटीक समाजाच्या संघटनेने ‘मल्हार सर्टिफिकेट’ची (Malhar Certificate) घोषणा केली आहे. याला जेजुरी श्री मार्तंड देवस्थानाने पाठिंबा जाहीर केला आहे.
या ‘मल्हार सर्टिफिकेट’च्या (Malhar Certificate) संकेतस्थळाचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केल्यानंतर त्याला जेजुरीचे श्री मार्तंड देवस्थानाचे एक विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना पत्र पाठवून नावावर आक्षेप घेतला. मांस विक्री संदर्भात दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर खंडोबा देवाचे ‘मल्हार’ नाव देवू नका असे पत्र पाठवून मागणी केली आहे त्यामुळे अचानक यावर गोंधळ निर्माण झाला असताना देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने मात्र पत्रक काढून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
श्री मल्हार म्हणजेच श्री खंडोबाराया हे देश व संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू समाजाचे कुलदैवत आहे. प्रत्येक मल्हार भक्त शुभकार्याची सुरुवात कुलदैवत साक्षीने व स्मरण करून करत असतो. प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यामधून असे निदर्शनास आले की हिंदू समाजाद्वारे मांस मटण विक्री संदर्भात ‘मल्हार’ सर्टिफिकेट (Malhar Certificate) योजना सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळात चर्चा होवून या योजनेला ‘मल्हार’ हे नाव देण्यास कसलाही आक्षेप असण्याचे कारण नाही. उलट या योजनेचे आम्ही स्वागत करत आहोत. ही देवसंस्थानची भूमिका स्पष्ट करीत आहोत असे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रसिध्दी पत्रकावर श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वास पानसे, पोपट खोमणे, अनिल सौंदडे यांच्या सह्या आहेत.
Join Our WhatsApp Community