महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील (Jejuri Khandoba Temple) मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून ( २८ ऑगस्ट ) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना बाहेरूनच देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही.
“गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही. दिनांक २६ ऑगस्ट ते ५ ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे,” अशी माहिती मंदिरांच्या विश्वस्तांकडून देण्यात .जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. गडावर विविध विकास कामे वेगात सुरू आहेत.
(हेही वाचा : Indian Real Estate Sector : भारतीय रियल इस्टेट क्षेत्र २०४७ पर्यंत होणार ५.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं)
खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकास कामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी-मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही.
हेही पहा