जेट एअरवेज हे विमान प्रवासी कंपनी ही मागील तीन वर्षे कर्जाच्या ओझ्याखाली होती, त्यामुळे ही कंपनी बंद होती, मात्र आता कंपनीचे विमान पुन्हा उड्डाण करणार आहे. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.
मागील महिनाभरापासून सराव उड्डाणे सुरु होती
वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी मागील बराच काळापासून प्रयत्न सुरु होते. कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता कंपनी लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. त्याआधी मागील महिनाभरापासून सराव उड्डाणे सुरु होती. 15 आणि 17 मे रोजी प्रोव्हाईडिंग फ्लाईट्सही कंपनीकडून उडवण्यात आल्या. ज्यात हवाई वाहतूक संचालनालयाचे अधिकारी होते. त्यांच्या पर्यवेक्षणानंतर आता एअर ऑपरेटर सर्टीफिकेट कंपनीला देण्यात आले आहे. ज्यामुळे आता कंपनी लवकरच सर्व नागरिकांसाठी विमानसेवा सुरु करणार आहे.
(हेही वाचा ज्ञानव्यापी प्रथमच धर्मांध मुस्लिमांनी झाली फुल्ल, पोलिसांचा कडक बंदोबस्त)
Join Our WhatsApp Community