Jet Airways : जेट एअरवेज अखेर अवसायनात, विमान उड्डाण क्षेत्रावर काय होणार परिणाम?

Jet Airways : जेट एअरवेज ही एकेकाळची अव्वल विमान कंपनी होती. 

105
Jet Airways : जेट एअरवेज अखेर अवसायनात, विमान उड्डाण क्षेत्रावर काय होणार परिणाम?
  • ऋजुता लुकतुके

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेज (Jet Airways) विमान कंपनी अवसायनात काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता कंपनीवर असलेलं कर्ज आणि इतर कुठल्याही मार्गांनी भरून काढण्याचे पर्याय संपले आहेत. आता कंपनीकडे असलेली सर्व मालमत्ता खुल्या बाजारात विकली जाईल आणि त्यातून पैसे वसूल केले जातील. दोन दशकांच्या वर देशांतर्गत विमान प्रवासावर वर्चस्व गाजवलेली जेट एअरवेज ही कंपनी अखेर नामशेष होणार आहे. भारतीय विमान उड्डाण क्षेत्रावर याचा नक्कीच मोठा परिणाम होणार आहे. खासकरून, ही बातमी आली तेव्हा एअर इंडिया आणि विस्तारा या कंपन्यांच विलिनीकरण दुसरीकडे सुरू आहे. या व्यवहारावरही या गोष्टीचा परिणाम होणार आहे.

१. स्पर्धा कमी होणार – पहिली दृश्य परिणाम होईल तो देशांतर्गत उड्डाणांमध्ये स्पर्धा कमी होण्यावर. जेट एअरवेज (Jet Airways) ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीतही एक मोठी कंपनी होती. आता ही कंपनी नामशेष झाल्यावर विमान उड्डाणाचे मार्ग आणि कंपन्यांचा बाजारपेठेतील हिस्सा यात आता नव्याने स्पर्धा सुरू होईल. विमान कंपन्यांनी देशाच्या विमान उड्डयण नियामक संस्थेकडे विमान उड्डाणाच्या वेळा आधीच बुक केलेल्या असतात. या वेळांसाठी आता इतर कंपन्यांच्या उड्या पडतील.

(हेही वाचा – Assembly Election च्या पार्श्वभूमीवर पूर्व उपनगरातून ५३ गुंडांना करण्यात आले तडीपार)

२. एअर इंडियाविस्तारा विलिनीकरणावर परिणाम – दुसरीकडे भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात सध्या एअर इंडिया आणि विस्तारा यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे या कंपनीला असलेली भविष्यातील स्पर्धा कमी होणार असली तरी नवीन कंपनीला जे एकत्रीकरणाचं काम करावं लागणार आहे ते अधिक क्लिष्ट आणि वेळखाऊ होईल. दोन्ही कंपन्यांची कर्मचारी वर्ग एकत्र करायचा आहे. आणि त्याचवेळी काही हजारांचा कर्मचारी वर्ग हा बेरोजगार असणार आहे. या गोष्टींचा मेळ कसा घालायचा हे या कंपन्यांना ठरवांव लागेल.

३. कंपनीचे गुंतवणूकदार – जेट एअरवेज (Jet Airways) ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आताही १.४३ कोटी लोकांकडे कंपनीचे शेअर आहेत. सध्या कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात ३४.१६ रुपयांवर बंद झाला आहे. आणि कंपनीची मालमत्ता विक्री झाल्यावर त्यातून १००० कोटी रुपयांची वसुली होईल असा अंदाज आहे. पण, कंपनीवरील एकूण कर्ज कामकाज थांबलं तेव्हाच २०० कोटींच्या घरात होतं. त्यामुळे आता किरकोळ गुंतणूकदारांना जेट एअरवेज मधील शेअर गुंतणुकीतून काही पैसे मिळतील का हे सांगणं कठीण आहे. गुंतवणूकदारांचं नुकसान होण्याची भीती आहे.

(हेही वाचा – Shikhar Bank घोटाळ्यात गैरव्यवहार झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा कायम; नव्याने न्यायालयात केला अर्ज)

४. मोठ्या कंपन्या नामशेष होण्याचा परिणाम – जेट एअरवेजने (Jet Airways) २००७ मध्ये एअर सहारा ही कंपनी विकत घेतली आणि तिथून कंपनीचे मालक नरेश गोयल यांची आर्थिक गणितं बिघडत गेली. कंपनी चालवणंही कठीण झालं. याच सुमारास विजय माल्या यांची किंगफिशर ही कंपनीही तोट्यात गेल्यामुळे बंद करावी लागली. सगळ्याच विमान कंपन्यांना कंपन्या चालवणं जड जातंय आणि त्याचवेळी कर्जाचा डोंगर सर करताना सरकारची आवश्यक मदत मिळत नसल्याचं किंवा विमान कंपन्यांच्या या समस्यांना उत्तर नसल्याचं दिसतंय. छोट्या विमान कंपन्याही सध्या नुकसानीतच चालत आहेत.

५. बेरोजगारी – जेट एअरवेजची (Jet Airways) उड्डाणं बंद झाली तेव्हापासून कंपनीचे २,५०० कर्मचारी वाऱ्यावर आहेत. आता अशावेळी कंपनी बंद होतेय जेव्हा एअर इंडिया-विस्तारा विलिनीकरण सुरू आहे. तिथे या क्षेत्रातील आणखी काही कर्मचारी कदाचित नोकरी गमावणार आहेत. अशावेळी विमान कंपन्यांना आणि संबंधित कामगारांनाही समस्यांना समोरं जावं लागणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.