कोरोनाने अनेकांमध्ये परस्परांमधील प्रेमभाव, जवळीकता निर्माण केली. धर्म, जात विसरून रुग्णाला वाचवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. यासाठी नागपुरातील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर (८५) यांचे उत्तम उदहारण आहे. कोरोनाबाधित दाभाडकर यांना जेव्हा त्यांचे प्राण वाचणार नाही, हे समजले, तेव्हा त्यांनी त्यांचा बेड एका गरजू तरुणाला देऊ केला आणि घरी गेले, त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळातील परोपकाराचे हे उदाहरण घडून १ दिवस उलटत नाही, तोच कोरोनाकाळात माणुसकीला काळिमा फासेल अशी घटना धुळ्यात घडली. येथील खासगी कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृताच्या खिशातील पैसे आणि दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
(हेही वाचा : सरकारकडून मदत जाहीर, पण अजून पोहचलीच नाही? लॉकडाऊनच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह!)
काय घडले नेमके प्रकरण?
- धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील खाजगी रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून घडला आहे.
- रुग्णालयात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या एक रुग्णाचा मृत्यू झाला.
- या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यासाठी एक बाजूला ठेवण्यात आला होता.
- मात्र त्याचवेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढली.
- हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
- ही महिती मृताचा नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला.
- रुग्णालय प्रशासनाने उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.