पंढपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून (Vitthal-Rukmini Mandir) दागिने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. च्या मंदिरातील देवीचे दागिने गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता या घटनेमुळे मंदिरातील दागिने चोरीला जाण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लेखा परीक्षण अहवालातून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे दागिन्यांची नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे. २०२१-२२च्या अहवालात ३१५ दागिन्यांचा समितीकडे अहवाल नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये चांदीचा पान पुडा, पिकदाणी, चांदीची दांडी असलेला हातपंखा, कुंकवासाठीची लहान वाटी, सोन्याची नथ तसेच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीच्या दागिन्यांनी मढवले आहेत. अशा ३१५ दागिन्यांची नोंद नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे. दागिन्यांचं मुल्यांकन न झाल्याचे स्पष्टिकरण मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
(हेही वाचा –JN.1 update : खबरदारी घ्या! JN.1चे ठाण्यात एकाच दिवसात पाच रुग्ण; देशातील आकडेवारी काय जाणून घ्या )