झारखंडमधील जामताडा येथील कलझारिया रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 12 जणांना रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. या भीषण अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंग एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. रेल्वेत आग लागल्याची माहिती कळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गोंधळलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून थेट खाली उडी घेण्यात सुरुवात केली. रेल्वे प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या आणि त्याच दरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या ट्रेनखाली १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर इतर प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
#WATCH | Jharkhand: Rescue operations are underway at Kalajharia railway station in Jamtara after a train ran over several passengers. https://t.co/kVDqS0PetF pic.twitter.com/ItEVsMhzAJ
— ANI (@ANI) February 28, 2024