पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदघाटन केलेल्या 5G इंटरनेट सर्व्हिसला दसऱ्याच्या दिवसापासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवार, ५ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांना 5G इंटरनेट सेवा अनुभवायला मिळणार आहे. ही सेवा खरे तर रिलायन्स आणि एअरटेल या दोन कंपन्या देणार आहेत. त्यामध्ये ही स्पर्धा लक्षात घेऊन रिलायन्सने एअरटेलची खेळी परतवून लावत रिलायन्स जिओने ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनी ग्राहकांना निमंत्रित करणार
त्यामुळे पहिल्या टप्प्यात यामुळे चार शहरांमध्ये Reliance Jio 5G network सुरु केले जाणार आहे. दिल्ली, वाराणसी, मुंबई आणि कोलकाता या चार शहरांतील नागरिकांना ही सुविधा मिळणार आहे. कंपनीने यासाठी वेलकम ऑफर जारी केली आहे. यानुसार कंपनी तुम्हाला 5G नेटवर्क वापरण्याची संधी देणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीला फिडबॅक देऊ शकणार आहात. जिओने 5G सेवा इन्व्हाईट बेस्ड ठेवली आहे, म्हणजेच कंपनी ग्राहकांना 5G सेवा वापरण्यासाठी निमंत्रित करणार आहे. ज्यांना हे निमंत्रण मिळेल तेच लोक जिओची 5G सेवा वापरू शकणार आहेत. किती ग्राहकांना कंपनी निमंत्रित करणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. त्यानुसार १ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड आणि अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community