Jio Finance Share : जिओ फायनान्स सुरू करणार स्वत:ची वित्तीय संस्था, मोठ्या बँकांवर होणार परिणाम

Jio Finance Share : रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे.

70
Jio Finance Share : जिओ फायनान्स सुरू करणार स्वत:ची वित्तीय संस्था, मोठ्या बँकांवर होणार परिणाम

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एका वर्षापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधून जिओ फायनान्स शेअर (Jio Finance Share) वेगळा केला. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वाजवी किमतीत गुंतवणूकदारांना उपलब्घ झाला ही एक गोष्ट. तर जिओ फायनान्सचा विस्तार आणि त्यासाठी पैसा जोडणं हे शेअर बाजाराच्या माध्यमातून कंपनीसाठी शक्य झालं. ही कंपनी वेगळी झाल्यापासून रिलायन्सने विविध योजना कंपनीच्या माध्यमातून जारी केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्स कंपनीच्या गृह कर्ज योजनेविषयी सुतोवाच केलं.

फक्त गृहकर्जच नाही तर मालमत्तेच्या बदल्यात तारण कर्ज आणि सुरक्षित कर्ज योजनाही कंपनी सुरू करणार आहे. या बातम्यांनंतर जिओ फायनान्सच्या शेअरमध्ये (Jio Finance Share)  मागचे दोन दिवस ९ टक्के तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकूणच शेअर बाजारात आलेली नफारुपी विक्री या शेअरसाठीही विक्रीचा तडाखा घेऊन आली. आणि शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर २ टक्क्यांच्या घसरणीसह ३३७ रुपयांवर बंद झाला.

(हेही वाचा – CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 60 लाखांची मागणी)

New Project 2024 09 08T140404.757

जिओ फायनान्स (Jio Finance Share)  कंपनीला अलीकडेच रिझर्व्ह बँकेकडून गुंतवणूक बँक म्हणून परवानगी मिळाली आहे. कंपनीने आपली गृहकर्ज योजना बिटा स्वरुपात पूर्वीच लाँच केली आहे. आता मोठ्या प्रमाणातील रोलआऊट साठी कंपनी तयार आहे. त्याचबरोबर ही बँकेतर वित्तीय संस्था विविध प्रकारची सुरक्षित कर्जही लोकांसाठी आणणार आहे.

रिलायन्स समुहातील कंपनी कर्जाच्या क्षेत्रात उतरत असल्यामुळे इतर बँका आणि वित्तीय संस्थांसमोरचं आव्हान नक्कीच वाढलं आहे. या बातमीमुळे शेअर बाजारातही हलचल वाढली आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंपनीचा शेअर ३९४ रुपयांच्या वर्षातील सर्वोच्च स्तरावर होता. त्यानंतरही शेअरमध्ये (Jio Finance Share)  सातत्यपूर्ण गुंतवणूक होताना दिसतेय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.