- ऋजुता लुकतुके
रिलायन्स समुहाच्या जिओ मोबाईल नेटवर्कची सेवा मंगळवारी देशभरात अनेक ठिकाणी विस्कळीत झाली होती. दुपारी बाराच्या सुमारास या तक्रारी सर्वात जास्त होत्या. दुपारी १२ बाजून १८ मिनिटांनी १०,७३१ लोकांनी जिओ चालत नसल्याची माहिती कंपनीला दिली होती. यात मोबाईल सेवेबरोबरच जिओ फायबर आणि केबल टीव्ही विषयीही तक्रारी होत्या. विशेष म्हणजे दुपारी ११ वाजून १३ मिनिटांनी तक्रारींची संख्या ९८३ होती. पुढच्या पाऊण तासांत ती दहा हजारांवर पोहोचली.
(हेही वाचा – Lebanon Pager Explosion : लेबनॉन बॉम्बस्फोटात ९ ठार, २८०० हून अधिक जखमी)
एकूण तक्रारींपैकी ६८ टक्के लोक हे मोबाईल सेवा बंद असल्याबद्दल, १८ टक्के लोक मोबाईल इंटरनेट बंद असल्याबद्दल तर १४ टक्के लोक फायबर सेवा बंद असल्याबद्दल तक्रार करत होते. मोबाईल सेवांची नियमितता तपासणाऱ्या डाऊन डिटेक्टर या वेबसाईटने ही माहिती दिली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, एअरटेल, बीएसएनएल, व्होडाफोन आयडिया या इतर सेवा भारतात नियमितपणे सुरू होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर जिओ सुरू नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘मुकेश अंबानी आज नाराज है,’ पासून ते ‘जिओवर साधा फोन करता येत नाहीए,’ अशा तक्रारी लोक इथं करताना दिसत होते.
(हेही वाचा – One Nation One Election: ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटची मंजूरी)
Jio Mobile Services down in Mumbai !!! Another major network outage !!!! 😕 #jiodown @reliancejio @JioCare pic.twitter.com/muRYQiXEWS
— Ravi🌅 (@ReInOvaTor_Pops) September 17, 2024
Mukesh Ambani naraaz hai #JioDown #JioOutage #Mumbai
— Miss Ordinaari (@shivangisahu05) September 17, 2024
(हेही वाचा – Instagram Accounts Locked : १३ ते १७ वयोगटातील मुलांची इन्स्टाग्राम खाती आता प्रायव्हेट राहणार )
दिवसभराच्या गोंधळानंतर रिलायन्सकडून या समस्येविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं. अगदी जागतिक स्तरावर रॉयटर्सनेही या बातमीची दखल घेतली. त्यानंतर जिओचं स्पष्टीकरणही त्यांनीच दिलं. रॉयटर्सने म्हटल्याप्रमाणे, ‘रिलायन्सच्या डेटा सेंटरमध्ये मुंबईत आग लागली होती. त्यामुळे देशभरातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. पण, आता आग आटोक्यात आली असून सेवाही सुरू झाली आहे.’
यानंतर काही वेळाने जिओ कंपनीने याविषयी अधिकृत माहितीही दिली. ‘काही तांत्रिक समस्यांमुळे मंगळवारी दुपारी जिओचं मोबाईल आणि इंटरनेट नेटवर्क विस्कळीत झालं होतं. ती तांत्रिक समस्या दूर करण्यात तंत्रज्ञांना यश आलं आहे. आता नेटवर्कही सुरळीत होईल. ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत,’ असं जिओच्या प्रवक्त्याने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community