#JioDown देशभरात जिओ सर्व्हर ठप्प! युजर्सची गैरसोय

160

जिओचा सर्व्हर बुधवार सकाळपासून डाऊन झाल्याने युजर्सची मोठ्या प्रमाणात गैरसोय झासी. इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाउनडिटेक्टरवर सुद्धा जिओ डाऊन असल्याचे दाखवण्यात येत आहे. ट्वीटरवर जिओला टॅग करत अनेकांची इंटरनेट सेवा वापरण्यात समस्या येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

DownDetector च्या ग्राफनुसार सकाळी ९.३० वाजल्यापासून जिओचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना समस्या येत होत्या. त्यानंतर ११ च्या सुमारात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली. यानंतर ट्वीटरवर JioDown हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

New Project 10 9

देशभरातील मोठ्या शहरांमध्ये ही समस्या आढळली. दिल्ली एनसीआर, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या शहरांमधील युजरकडून सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

ट्वीटरवर तक्रारी

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.