Jio-Star Layoff : जिओ स्टारमधून १,१०० लोकांची गच्छंती अटळ

अलीकडेच जिओ आणि स्टार यांच्या विलिनीकरणानंतर जिओ-स्टार कंपनी स्थापन झाली आहे

56
Jio-Star Layoff : जिओ स्टारमधून १,१०० लोकांची गच्छंती अटळ
Jio-Star Layoff : जिओ स्टारमधून १,१०० लोकांची गच्छंती अटळ
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि डिस्नी हॉटस्टार (Disney Hotstar) यांच्या विलिनीकरणानंतर जिओ – स्टार ही देशातील सगळ्यात मोठी मीडिया कंपनी उदयाला आली आहे. अशा प्रक्रियेनंतरची अपरिहार्य गोष्ट म्हणजे नोकर कपात, ती ही आता अटळ बनली आहे. नवीन जिओ – स्टार कंपनीतून १,१०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचं समजतंय. किंबहुना एका महिन्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू झाल्याचंही कळतंय. काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा अनुभव तसंच ते कधीपासून कंपनीत काम करतायत यावर आधारित सांत्वनपर पॅकेज दिलं जाईल. (Jio-Star Layoff)

वित्त विभाग, जाहिरात विभाग, वितरण आणि कायदे विभागातील लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बाकी क्रीडा प्रसारणासाठी सध्याचं डिस्नी हॉटस्टारचं (Disney Hotstar) मॉडेल कायम करण्यात येईल. त्यासाठी सध्याचे डिस्नेतील कर्मचारीच काम करतील. तर इतर मनोरंजन विषयक कार्यक्रमांसाठी जिओ सिनेमाचं मॉडेल कायम ठेवण्यात येईल. जिओ सिनेमा (Jio Cinema) आणि जिओ स्टार असे दोन ओटीटी प्लॅटफॉर्म आता कार्यरत आहेत. (Jio-Star Layoff)

(हेही वाचा – मोतीलाल नगरचा पुनर्विकास खासगी कंपन्या करणार; Bombay High Court ने म्हाडाचा अर्ज केला मान्य )

कंपनीतील अनुभवी संचालक, व्यवस्थापक आणि अगदी उपाध्यक्षांनाही या कपातीची फटका बसणार आहे. क्रीडाविषयक कार्यक्रमासाठी काम करणाऱ्यांना या कपातीचा फटका बसणार नाही. कारण, जिओस्टारकडून दोन नवीन वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विभाग येत्या काही दिवसांत नोकर भरतीची शक्यता आहे. (Jio-Star Layoff)

जिओ स्टारमधील काही कर्मचाऱ्यांनी परिस्थितीची कल्पना आल्यावर स्वत:हून नोकरी सोडण्याचा पर्याय स्वीकारला आहे. आणि या कंपनीतून प्रतिस्पर्धी मीडिया समुहाकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. (Jio-Star Layoff)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.