Jio True 5G: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ‘इतका’ सुस्साट इंटरनेट स्पीड

168

पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स Jio True 5G सेवा आता पुण्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणणारी जिओ 5G सेवा अधिकृतपणे पुण्यात मिळणार आहे. बुधवारी जिओने पुण्यात 1Gbps स्पीडसह अमर्यादित 5G डेटाची सुरूवात केली. जिओने पुणे शहरात जिओची ट्रू 5G ची बीटा सेवा सुरू केली असून या अंतर्गत शहरातील बहुतांश भागात स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह, जिओच्या ग्राहकांना चांगले कव्हरेज आणि अत्याधुनिक जिओ 5G नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान, जिओची ट्रू 5G सेवा ऑक्टोबरमध्ये चार शहरांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अलीकडेच बेंगळुरू, नाथद्वारा आणि हैदराबादमध्ये सुरू करण्यात आली होती. यावेळी, जिओ 5G बीटा चाचण्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे सुरू होत्या. पुण्याच्या समावेशासह, जिओची ट्रू 5G सेवा आता 9 भारतीय शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे.

(हेही वाचा – SBI च्या एटीएम कार्डसह FREE मिळतो २० लाखांचा विमा! असा करा इन्शुरन्स क्लेम)

जाणून घ्या जिओ वेलकम ऑफरबद्दल…

जिओने घोषणा केली की, जे युजर्स त्यांच्या शहरांमध्ये 5G सेवा अॅक्सेस करू शकतात त्यांना 1Gbps पर्यंत अमर्यादित डेटा मिळणार आहे. नवीन ऑफर लाँच होईपर्यंत ही जिओ 5G वेलकम ऑफर 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे. जिओ 5G सेवा आता पुण्यात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही वरील शहरापैकी कोणत्याही एका शहरात राहात असाल, तर तुम्ही जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला या शहरांमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय जिओ 5G सेवांचा लाभ घेता येईल. जोपर्यंत कंपनी 5G रिचार्ज योजना उघड करत नाही तोपर्यंत जिओ 5G वेलकम ऑफर तुम्हाला जिओ 5G नेटवर्क 1Gbps वेगाने अमर्यादित डेटासह वापरण्याची परवानगी मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.