जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडून अक्षम्य चूक केली. पोटात एक अन् ओठांत एक ठेवून महामानवाचा अवमान करण्याचे त्यांचे धाडस निषेधार्ह आहे. त्यांनी प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी केली. देशातील कोणताही व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेली अक्षम्य चूक लक्षात घेता त्याचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – BJP : निवडणूक निकालानंतर भाजपा ‘भाकरी फिरवणार’?)
आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी
या वेळी नवनाथ शिराळे, बालाजी पवार, प्रमोद रामदासी, केशव बडे, अमोल वडतिले, बद्रीनाथ जटाळ, लालासाहेब पन्हाळे, राजू शहाणे, अनिल शेळके, बंटी भिसे, महेश सावंत, विलास काकडे, अश्विन शेळके, महादेव नैराळे, विशाल पाखरे, मनोज आगे, शफिक भाई काजी, राम चव्हाण, गणेश शेंडगे, सचिन जाधव, सचिन मस्के, स्वप्नील मस्के, रवींद्र कळसाने, राम बहिरवाळ, प्रल्हाद चित्रे, दिलीप डोंगर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते जीतेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर स्टंटबाजी करत मनुस्मृती जाळली. या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्रही फाडले. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राजेंद्र मस्के यांनीही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
हेही पहा
Join Our WhatsApp Community