राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी, यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोक (manusmriti shlok), मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याला विरोध करतांना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या श्लोकाचा अर्थही समजून न घेता थयथयाट चालू केला आहे. आव्हाड यांनी थेट रायगडच्या महाड (Mahad) येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन केले. तसेच सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच मनूस्मृतीच्या प्रती फाडून त्या जाळण्याचा आततायीपणा आव्हाड यांनी त्यांच्या समर्थकांच्या सोबत केला. या वेळी त्यांनी स्टंटबाजी करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.
(हेही वाचा – Shivaji Maharaj Rajyabhishek : असा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा!)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. त्यामुळे आव्हाडांनी याच ठिकाणी स्टंटबाजी केली. महाड पोलिसांकडून त्यांना हे आंदोलनं रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
काय आहे त्या श्लोकाचा अर्थ ?
वास्तविक राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना मूल्ये आणि चारित्र्य शिकवणार्या धड्यात मनुस्मृतीतील ‘अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम ।’ (अर्थ : ज्येष्ठ नागरिक, पालक आणि शिक्षक यांचा आदर अन् सेवा करणार्यांचे आयुष्य, यश, विद्या आणि बळ वाढते.) हा श्लोक घेतला आहे. या श्लोकातून ज्येष्ठांचा आदर, सन्मान आणि सेवा करण्यास शिकवण्याचा उद्देश असतांनाही केवळ तो ‘मनुस्मृतीतील श्लोक’ असल्याच्या कारणावरून आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती जाळण्याचा प्रकार केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community