भायखळा येथील जे जे सरकारी रुग्णालयात आता २४ तास रुग्णांना एमआरआय तपासणी उपलब्ध होणार आहे. ही सेवा एक ऑगस्टपासून सुरु करण्यात येईल. जे जे रुग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला. तपासणीच्या तारखेबाबत माहिती देण्यासाठी रुग्णांना मोबाईलवर अगोदरच संदेश पाठवला जाईल.
(हेही वाचा – Conversion : तरुणीवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करणाऱ्या तरुणाला अटक)
रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मोबाईल संदेश पाठवत तपासणीची वेळ आगाऊ कळवली जाईल. राज्यातील इतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयांच्या तुलनेत रुग्णसेवेचा भार अधिक असतो. दक्षिण मुंबईतील पालिका रुग्णालयातील रुग्णसेवा डगमगल्यास जेजे रुग्णालयात रुग्णसेवेचा ताण वाढतो. तपासणी सेवा वाढवण्यावर गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालय प्रशासन विचारधीन होते. रुग्णालययाच्या रेडिओलॉजी विभागाने पुढाकार घेत एमआरआय तपासणी दिवसभर सुरु करण्याचे ठरवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community