जे.जे. रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयामध्ये ३० जानेवारी २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये कुष्ठरोग पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जनजागृती अभियान, मॅरेथॉन स्पर्धा, पथनाट्य असे विविध उपक्रम यानिमित्ताने राबवण्यात येणार आहेत. एकवर्थ कुष्ठरोग रुग्णालय वडाळा येथे या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
( हेही वाचा : Budget 2023: अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर…)
एकवर्थ कुष्ठरोग रुग्णालयातील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे, प्राचार्य डॉ. अपर्णा संखे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी एकवर्थ कुष्ठरोग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. पेडणेकर, सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग तसेच एस डब्ल्यू ए ॲडव्हायझर हेमलता गजबे , समन्वयक सुनिता चांदूरकर , विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व चतुर्थ वर्ष बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका व एकवर्थ रुग्णालयांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या लेप्रसी रन मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात विष्णू राखोंडे यास प्रथम, पुरुषोत्तम अंभोरे यास द्वितीय व उदय वसावे याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तसेच महिला गटामध्ये स्वाती लाटे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
Join Our WhatsApp Community