Job Opportunity: मुंबई पोर्ट ट्रस्ट, महावितरणमध्ये नोकरीची संधी! किती पदांसाठी आहे भरती? 

122
सध्या नोकरीसाठी तरुण वणवण भटकत आहेत, आधीच सरकारी खात्यांमध्ये भरती बंद झाली आहे, अशा स्थितीत एखाद्या सरकारी खात्यात भरती सुरु झाली, तर मोठी संधी समजली जाते, अशा प्रकारे तरुणांना मुंबई पोर्ट ट्रस्ट, महावितरण (नाशिक) येथे नोकरीची संधी आली आहे. या ठिकाणी नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ९ जागा 

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये सध्या ९ जागांसाठी भरती होणार आहे. यात उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी एकूण आठ जागा उपलब्ध आहेत. याकरता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा समतुल्य तसेच १२ वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
(हेही वाचा देशभरात साडेसहा लाख मंदिरे! महाराष्ट्रात किती? आयआयटी प्राध्यापकांच्या अहवालातील माहिती)

उपमुख्य दक्षता अधिकारी पदासाठी एक जागा उपलब्ध आहे. यासाठी पदवीधर असण्याची असण्याची अट आहे. ४२ वर्षांपर्यंत वयोमर्यादा यासाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २२,२३,२७ जून २०२२ आहे. www.mumbaiport.gov.in या वेबसाईटवर तुम्ही अधिकचे तपशील पाहू शकता.

अर्ज कुठे पाठवाल?

सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, एस व्ही मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१

महावितरणमध्ये १४९ जागा 

नाशिक येथील महावितरण कार्यालयात इलेक्ट्रिशियन, वायरमनसाठी भरती होणार आहे. यासाठी १० वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण १४९ जागांसाठी ही भरती आहे. १८ ते २१ वर्षांपर्यंतचे उमदेवार यासाठी अर्ज करु शकतील. ३ जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकची माहिती तुम्ही www.mahatransco.in या वेबसाईटवर तपासू शकता.

अर्ज कुठे पाठवाल?

अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड, नाशिक – ४२२१०१
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.