लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी, हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे 4 हजार 700 रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
या वेबसाईटवर करा अर्ज करा
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये तसेच संबंधित विभागांमध्ये सचिवालय सहायक, लोवर डिविजन क्लर्क, डाक सहायक आणि डेटा एंट्री ऑपरेटरची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे करण्यात येणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करु शकतात.
( हेही वाचा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी! ‘या’ संकेतस्थळावर उपलब्ध… )
पद, पात्रता व वयोमर्यादा
पदांचे नाव – निम्न विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहायक/वर्गीकरण सहायक, डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
पदसंख्या – अंदाजे 4700+ पदे
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
( हेही वाचा : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? तर तुमच्यासाठी ही आहे आनंदाची बातमी )
अर्ज शुल्क –
इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
महिला, SC, ST, PWD, माजी सैनिक उमेदवारांसाठी – शून्य रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 1 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in