बेरोजगारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! मिळेल भरगच्च पगार, या ठिकाणी करा अर्ज!

156

सध्या बेरोजगार चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी संधी चालून आली आहे. विशेष म्हणजे ही सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मीरा भाईंदर महापालिका आणि पुणे महापालिकेत ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या नोकरीसाठी कुठे आणि कधी अर्ज करायचा आहे, हे जाणून घ्या!

कोल इंडिया लिमिटेड 

  • संपू्र्ण देशभरात ही भरती होत आहे
  • पोस्ट – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • एकूण जागा – 481 (पर्सनल अँड एचआर – 138, पर्यावरण – 68, मटेरियल्स मॅनेजमेंट – 115, मार्केटिंग अँड सेल्स – 17, कम्युनिटी डेव्हलेपमेंट – 79, लीगल – 54, पब्लिक रिलेशन्स – 6, कंपनी सेक्रेटरी – 4)
  • शैक्षणिक पात्रता – MBA/PG डिप्लोमा/PG पदवी/M.Tech असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून, भारतातील योग्य वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि 2 वर्षांचा नियमित पूर्णवेळ अभ्यासक्रम असावा.
  • वयोमर्यादा – 30 वर्ष
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2022
  • तपशील – www.coalindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर career with CIL यावर क्लिक करा. jobs at coal india यावर क्लिक करा. संंबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

(हेही वाचा युरोपात तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहचणार! उष्णतेच्या लाटेने मृत्यूचे तांडव होणार?)

पुणे महानगरपालिका

  • पोस्ट – समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • एकूण जागा – 12 (यात समुपदेशक पदासाठी 11 जागा आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी 1 जागा आहे.)
  • शैक्षणिक पात्रता – समुपदेशक पदासाठी पदवीधर, मास्टर ऑफ सोशल वर्कची पदवी (MSW), तीन वर्षांचा अनुभव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc., DMLT, तीन वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा – 18  ते 38  वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-  411005
  • मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2022
  • तपशील – www.pmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर सेवा भरतीवर क्लिक करा. आरोग्य विभागातली जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई

  • पोस्ट – अधिकारी (विपणन)
  • एकूण जागा – 18
  • शैक्षणिक पात्रता – नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.
  • वयोमर्यादा – 34 वर्षांपर्यंत
  • ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
  • तपशील – www.rcfltd.com  (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

(हेही वाचा शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, प्रवक्तेपदावरुन राऊतांचा पत्ता कट! पक्षप्रमुखपदी कोण?)

मिरा भाईंदर महानगरपालिका

  • पोस्ट – शिक्षक (प्राथमिक, माध्यमिक)
  • एकूण जागा – 44
  • शैक्षणिक पात्रता – प्राथमिकसाठी बारावी विज्ञान आणि D.Ed. किंवा B.Sc. आणि B.Ed. आणि माध्यमिकसाठी B.Sc. आणि B.Ed.
  • वेतन –  प्राथमिक १५,०००, माध्यमिक २०, ०००
  • नोकरीचे ठिकाण – भाईंदर
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता- आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प.).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
  • तपशील – www.mbmc.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर नवीन माहितीमध्ये सेमी इंग्रजी माध्यम, ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून घेणेबाबत. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.