भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड

185

भारतीय पोस्टाच्या टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी टपाल जीवन विमा विभागात हजर रहावे लागणार आहे.

( हेही वाचा : AC Local : प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार)

नियम व अटी 

  • पदाचे नाव – अभिकर्ता
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • वयोमर्यादा – १८ ते ५० वर्ष
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – ४००१०१
  • मुलाखतीची तारीख – १७ आणि १८ ऑगस्ट
  • अधिकृत वेबसाईट – www.india.post.gov.in     

( हेही वाचा : १ लाख मुंबईकरांचा १ रुपयात ‘बेस्ट’ प्रवास!)

  1. वरील पदांकरता निवडप्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे.
  3. सदर पदांसाठी मुलाखत १७ आणि १८ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.