राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे येथे समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ ही आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा; कुणाचा फायदा, कुणाला तोटा? )
अटी व नियम
- पदाचे नाव – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – ६ जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज शुल्क – १५० रुपये
- वयोमर्यादा – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक
खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे - वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ ऑक्टोबर २०२२
- अर्ज सुरू शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org
- या लिंकवर करा अर्ज – https://www.ddhspune.com/
पात्रता
- समुपदेशक – मास्टर इन सोशल वर्क
- लेखापाल – बी.कॉम, टॅली प्रमाणपत्र आवश्यक, MSCIT
- सांख्यिकी सहाय्यक – graduation in statasctics or mathematics, MSCIT
- वैद्यकीय अधिकारी – MBBS/MCI/MMC council registration
वेतनश्रेणी
- समुपदेशक – २० हजार रुपये
- लेखापाल – १८ हजार रुपये
- सांख्यिकी सहाय्यक – १८ हजार रुपये
- वैद्यकीय अधिकारी – ६० हजार रुपये