पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ४४८ पदांसाठी भरती

कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे अलिकडे प्रत्येकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अशा सर्वांना पुणे महानगरपालिकेने दिलासा दिला आहे. पुणे महापालिकेमार्फत एकूण ४४८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेविषयी माहिती खालीलप्रमाणे…

( हेही वाचा : मुंबई – पुणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! अनुभवता येईल निसर्गाचे विहंगम दृश्य )

पुणे महानगरपालिकेतंर्गत सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता ( वाहतूक नियोजन) आणि सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण ४४८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

रिक्त जागांची माहिती 

पदाचे नाव रिक्त जागा
सहायक विधि अधिकारी 4
लिपिक टंकलेखक 200
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य 135
कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी 5
कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक 4
सहायक अतिक्रमण निरीक्षक 100
एकूण जागा 448

 

अटी व नियम 

 • शैक्षणिक पात्रता – Law Degree, BE, SSC
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज शुल्क
  खुल्या प्रवर्गासाठी – १ हजार रुपये
  राखीव प्रवर्गासाठी – ८०० रुपये
 • वयोमर्यादा
  खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
  राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑगस्ट २०२२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here