नोकरीची सुवर्णसंधी! पीएमपीत लवकरच दोन हजार वाहकांची भरती

103

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला बसवरील वाहकांची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे दोन हजार कंडक्टरची (वाहक) भरती बदली हंगामी रोजंदारी पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

( हेही वाचा : भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड)

पीएमपीमध्ये लवकरच होणार दोन हजार वाहक भरती 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १६५० बसच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. सध्या पीएमपीकडे ४१०० वाहक आहेत. तरीही पीएमपीला वाहकांची आवश्यकता असून यामुळेच पीएमपीकडून आता आगामी काळात दोन हजार वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.

वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपीने निविदा प्रक्रिया सुरू केली असून नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा तुमचे काम करून देतो असे सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये, आर्थिक देवाण घेवाण करू नये असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. वाहकांची कमतरता असल्यामुळे आम्ही नव्या ६०० चालकांना वाहक बनवले आहे तसेच २ हजार वाहकांची भरती सुद्धा करण्यात येणार आहे असे वाहतूक व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.