रातोरात झाले बेरोजगार, पिंपरी-चिंचवडमध्ये शंभराहून अधिक कामगारांवर बेकारीची कु-हाड

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आता कामगारांवरच अन्याय होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोसरी MIDC परिसरातील एका कंपनीचा रात्रीतच गाशा गुंडाळत कंपनीने कर्मचारी आणि इतर कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १०० पेक्षा अधिक कामगारांना नोटीस देत कामावरून कमी करण्यात आले आहे. या विरोधात बुधवारी, 27 जुलै रोजी कंपनीच्या कामगारांनी बंद पडलेल्या कंपनीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन केले.

पूर्वसूचना न देता कारवाई

भोसरी MIDC परिसरातील एक्सएएलटूल इंडिया नावाची विदेशी कंपनी मागील अनेक वर्षापासून पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत होती, मात्र कंपनीची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. भारतात कंपनीला पुढील कामकाज करता येणार नसल्याचे कारण देत थेट कंपनी बेकायदेशीरपणे बंद करत कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनीच्या अनेक कामगारांचे असे म्हणणे आहे की, थकीत पगार, कायदेशीर देणी असून आणि सोबतच आमचे भविष्य धोक्यात आले आहे. कंपनीच्या मुजर प्रशासनाने आमच्या भविष्याबद्दल चर्चा करून निर्णय घ्यावा आणि आमच्या उपासमारीची वेळ येऊ नये यासंबधी निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगारांनी केली. कामगारांना नोटीस पिरेड न देता व कुठलीही पूर्वसूचना न देता थेट काढण्यात आल्याने कंपनीच्या प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत न राहता हे पाऊल उचलेले असताना कंपनीच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

(हेही वाचा महाबळेश्वरमधील पॉइंट्सची नावे बदलणार?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here